4 Seasons Bar समोरील रस्ता बॅरिकेड्स लावून सुरक्षित; १० ते १५ दिवसांत दुरुस्तीचे आश्वासन
कल्याण : न्यू कल्याण रोडवरील 4 Seasons Bar समोरील रस्ता आज अचानक खचल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
प्रशासनाची तातडीने कार्यवाही
या घटनेची माहिती मिळताच A.D.T.P. चे उपअभियंता मा. श्री. अवधूत मदन साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी पाहणी केली.
रस्ता खचलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून परिसर सुरक्षित करण्यात आला. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि वाहतूक सुरळीत सुरू राहावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.
१० ते १५ दिवसांत दुरुस्तीचे आश्वासन
खचलेल्या रस्त्याची आवश्यक दुरुस्ती येत्या १० ते १५ दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन उपअभियंता अवधूत मदन यांनी दिले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच तातडीने उपाययोजना करणे ही प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांचीही जबाबदारी आहे. नागरिकांच्या समस्या आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही यापुढेही सातत्याने केली जाईल.






