कल्याण : कल्याण पूर्व परिसरातील युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, नगरसेवक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विधानसभा उपाध्यक्ष अनिश भाऊ वर्गीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
३६५ दिवस मोफत जॉब प्लेसमेंट
या रोजगार उपक्रमाच्या माध्यमातून युवक-युवतींना मोफत जॉब प्लेसमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, हे रोजगार केंद्र वर्षभर म्हणजेच ३६५ दिवस सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. उमेदवारांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच योग्य मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
विविध सामाजिक उपक्रम
कल्याण पूर्वेतील राजेश्वरी कॉलनी, शॉप क्रमांक १, काशीश इंटरनॅशनल हॉटेलसमोर, श्री मलंग रोड येथे हा रोजगार उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन आणि जॉब प्लेसमेंटची सुविधा मिळणार आहे.
अनिश भाऊ वर्गीस यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वैद्यकीय मदत कक्ष यांसह विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
कार्यक्रमाला शिवसेना संपर्कप्रमुख व नगरसेवक तसेच स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड, महिला जिल्हा संपर्क संघटक कविता गावंड, विधानसभा उपाध्यक्ष अनिश भाऊ वर्गीस, युवा सेना विभाग अध्यक्ष ऋषिकेश गुप्ता यांच्यासह वैशाली सोनवणे, कोमल पटेल, जयश्री परमार, मेरी टीचर, निमित्त कदम, किरण भोईर तसेच शिवसेना आणि युवा सेनेच्या महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींचा उपयोग करून आपल्या करिअरला दिशा द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






