महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण

कल्याण : महान क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनही अभिवादन
यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू धराडे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, अधीक्षक भूषण कोकणे, सचिव विभागातील वरिष्ठ लिपिक प्रविणा कांबळे, शिक्षण विभागाच्या अर्चना जाधव तसेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले. क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या शौर्य व देशभक्तीच्या कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले.






