महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी अर्पण केली पुष्पांजली
कल्याण : भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या जयंतीनिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिवादन
या प्रसंगी महानगरपालिकेच्या उपायुक्त कांचन गायकवाड, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहायक जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत, वरिष्ठ लिपिक प्रविणा कांबळे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. त्यांनीही भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमातून भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.






