आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून ६४ वर्षीय विद्या सुळे यांची मोफत हाताची शस्त्रक्रिया
कल्याण : जनसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदतीचा हात देणारे आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे अनेकांसाठी आधारवड ठरत आहेत. त्यांच्या माध्यमातून डोंबिवली येथील सौ. विद्या सुळे (वय ६४) यांची हाताची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली.
आरोग्यविषयक अडचणींनी त्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावेत, आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचाही उपचार थांबू नये, यासाठी जितेंद्र पाटील सातत्याने प्रयत्नशील आहेत. कल्याण परिसरात आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून ते विविध रुग्णांना वैद्यकीय मदत, मार्गदर्शन आणि आवश्यक उपचारासाठी सहकार्य करत आहेत.
विद्या सुळे यांच्या हाताच्या शस्त्रक्रियेसाठीही जितेंद्र पाटील यांनी पुढाकार घेत आवश्यक मदत उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गरजू रुग्णांच्या मदतीसाठी सातत्याने धावून जाणाऱ्या जितेंद्र पाटील यांच्या सेवाभावी कार्यामुळे नागरिक त्यांच्याकडे ‘देवदूत’ म्हणून पाहू लागले आहेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता रुग्णसेवेसाठी कार्यरत राहणे, हाच खरा समाजसेवेचा धर्म असल्याची भावना त्यांच्या कार्यातून दिसून येत आहे.
“गरजू रुग्णाला योग्य वेळी उपचार मिळणे, त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलणे, यापेक्षा मोठे समाधान दुसरे नाही,” अशी भावना या सेवाभावी कार्यातून व्यक्त होत आहे.
जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या रुग्णसेवेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या उक्तीचा प्रत्यय त्यांच्या कार्यातून येत आहे.






