सर्पमित्र कपिल कारभारी यांनी सुरक्षितरीत्या पकडून घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडले
कल्याण : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील माधव बँक्वेट हॉलमध्ये घोरपड आढळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माहिती मिळताच सर्पमित्र कपिल कारभारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घोरपडीला सुरक्षितरीत्या पकडले आणि नंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
नागरिकांना आवाहन
सर्पमित्र कपिल कारभारी यांच्या सतर्कतेमुळे घोरपडीचे प्राण वाचले. वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता अथवा त्यांना इजा न करता तातडीने सर्पमित्र किंवा संबंधित यंत्रणेची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






