कल्याण : जे. पी. ग्रुप मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेली दहीहंडी उत्सवाची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात कायम ठेवण्यात आली. गोविंदा पथकांचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
जयंता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजन
जे. पी. ग्रुप मित्र मंडळाचे अध्यक्ष, शिवसेना उपतालुकाप्रमुख कल्याण ग्रामीण तथा माजी सरपंच जयंता दत्तू पाटील यांच्या नेतृत्वाखाली या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. उत्सवात विविध गोविंदा पथकांनी सहभाग घेत जल्लोष केला.
पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती
यावेळी प्रवीण जोशी, शिवाजी शेजू, चिन्मय पाटील, मनोज मोरे, पटवा मॅडम, अमित कोरगावकर, विशाल बोतले आणि साई पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गोविंदा पथकांचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२८ वर्षांची परंपरा जपत आयोजित करण्यात येणाऱ्या जे. पी. ग्रुप मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवाला दरवर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यंदाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्सवाचा आनंद घेतला.






