डोंबिवली : डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने पारंपरिक ‘मंगळागौर’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महापौर हर्षाली थविल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शिवसेना महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पारंपरिक खेळांनी रंगत
महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मंगळागौरीचे विविध खेळ, फुगडी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम साद केले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला पारंपरिक आणि सांस्कृतिक रंगत आली.
महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती
या सोहळ्याला शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह परिसरातील महिलांची मोठी उपस्थिती होती. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच पारंपरिक संस्कृती आणि लोकपरंपरा जपली जावी, या उद्देशाने मंगळागौर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.






