डोंबिवली : रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि अतूट नात्याचा उत्सव. सर्वत्र रक्षाबंधन उत्साहात साजरे होत असताना मनसे नेते राजू पाटील यांनीही आपल्या बहिणींसोबत हा सण साजरा केला. मात्र, पाटील यांच्यासाठी यंदाचे रक्षाबंधन विशेष ठरले ते त्यांच्या जुळ्या बहिणीमुळे!

राजू पाटील यांची जुळी बहीण प्रेमा खरबे यांनी त्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. जुळ्या भाऊ-बहिणीच्या नात्यामुळे हा क्षण विशेष भावनिक आणि जिव्हाळ्याचा ठरला. बहिणीने औक्षण करून राखी बांधल्यानंतर भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा हा खास क्षण उपस्थितांसाठीही आकर्षणाचा ठरला.
राजू पाटील यांना प्रेमा खरबे यांच्यासह आणखी काही बहिणी आणि भाऊ आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबीय एकत्र येत या सणाचा आनंद घेतला.
राजकीय धावपळीच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबीयांसोबत साजरा केलेला रक्षाबंधनाचा हा खास क्षण चर्चेचा विषय ठरला आहे.






