कल्याण : रक्षाबंधनानिमित्त नगरसेवक सचिन पोटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राखी बांधणी कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील असंख्य महिलांनी सचिन पोटे यांना राखी बांधून बहीण-भावाच्या नात्याचा स्नेह जपला.
यावेळी महिलांनी सचिन पोटे यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. पोटे यांनीही उपस्थित महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सदैव त्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. भावनिक आणि आनंदी वातावरणात हा रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला.






