मुंबई : नारळी पौर्णिमेनिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वरळी कोळीवाड्याला भेट देत कोळी बांधवांसोबत सण उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांनी समुद्राला नारळ अर्पण करून पारंपरिक पद्धतीने पूजा केली आणि कोळी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
नारळी पौर्णिमा हा कोळी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून, या निमित्ताने समुद्राची पूजा करून सुरक्षित आणि सुखकर मासेमारी हंगामासाठी प्रार्थना केली जाते. यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोळी बांधवांशी संवाद साधत त्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. उत्साहपूर्ण वातावरणात हा पारंपरिक सोहळा पार पडला.






