डोंबिवली : सर्वत्र रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असताना मनसे नेते राजू पाटील यांनीही आपल्या कुटुंबीयांसोबत रक्षाबंधन साजरे केले. मात्र, यंदाचे रक्षाबंधन त्यांच्यासाठी विशेष ठरले. राजू पाटील यांना जुळी बहीण असून तिचे नाव प्रेमा खरबे आहे. जुळ्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा हा खास क्षण कुटुंबीयांसाठी आनंदाचा ठरला.
प्रेमा खरबे यांनी राजू पाटील यांच्या मनगटावर राखी बांधून औक्षण केले. यावेळी भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि स्नेहाचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. राजू पाटील यांना आणखी काही बहिणी तसेच भाऊ असून, कुटुंबातील सर्वांनी एकत्र येत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.






