कल्याण : रक्षाबंधनाचे औचित्य साधून खडेगोळवली येथील राजे शिवाजी विद्यालय तसेच कैलाश नगर येथील वेणूबाई पावसे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तब्बल १ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रक्षाबंधनाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक मधुर म्हात्रे, चंद्रशेखर म्हात्रे, गणेश पगारे, हेमंत केणे आणि राकेश देशमुख यांनी केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास रोहित राजपूत, गणेश पवार यांच्यासह विभागातील शिवसैनिक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वह्यांचे वाटप आणि रक्षाबंधनामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.






