कल्याण : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या कार्यालयात रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आमदार मोरे यांच्या मनगटावर राखी बांधून बहीण-भावाच्या नात्याचा स्नेह जपला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी महिलांनी आमदार राजेश मोरे यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महिलांशी संवाद साधताना आमदार मोरे यांनी उपस्थित सर्व भगिनींचे आभार मानत समाजातील बंधुभाव, आपुलकी आणि एकोप्याचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश दिला.
या रक्षाबंधन सोहळ्यास अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राखीच्या पवित्र धाग्याने स्नेहबंध अधिक घट्ट करणारा हा सोहळा आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.






