
कल्याण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मलंगगड रोडच्या डांबरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. भाजप आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी रस्त्याच्या सुरू असलेल्या डांबरीकरण कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
मलंगगड रोड हा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा मार्ग असून, गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमदार गायकवाड यांनी संबंधितांकडून माहिती घेतली. गणेशोत्सवापूर्वी रस्ता चकाचक झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.






