कल्याण : रक्षाबंधनाचा सण आणि वाढदिवसाचा आनंद एकाच दिवशी आल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सदस्या सौ. ज्योती राजन मराठे यांचा वाढदिवस उत्साहाच्या वातावरणात जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, मित्रमंडळी, नातेवाईक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमाची सुरुवात पाच सुहासिनींच्या हस्ते ज्योती मराठे यांचे औक्षण करून करण्यात आली. त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. केक कापताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. महिला पदाधिकाऱ्यांसह उपस्थित महिलांनीही त्यांना शुभेच्छा देत रक्षाबंधनाचा सण आणि वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला.
आमदार राजेश मोरेंकडून विशेष शुभेच्छा
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन ज्योती मराठे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
माजी नगरसेवक राजन मराठे तसेच विद्यमान नगरसेवक सूरज राजन मराठे यांच्या वतीने उपस्थित कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांसाठी प्रीतीभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त झालेली मोठी गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आप्तेष्टांच्या प्रेमासोबतच कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांनी ज्योती मराठे यांचा वाढदिवस विशेष ठरला.






