कल्याण : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भाजप नेते तथा कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पारनाका येथे वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या परिसरात शेकडो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत यावेळी ईश्वर औदुंबर वृक्षाचे विशेष रोपण करण्यात आले. स्वामी समर्थ सेवेकरी परिवाराने मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी कल्याणमधील प्रसिद्ध उद्योजक राजू गवळी, प्रकाश भराडिया यांच्यासह अनेक मान्यवर आणि सेवेकरी उपस्थित होते. उपस्थितांनी नरेंद्र पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा दिलेला संदेश हा उपक्रमाचा विशेष ठरला.






