खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदा पथकांना टी-शर्ट वाटप
डोंबिवली : दहीहंडी उत्सवाचा जल्लोष आणि गोविंदा पथकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदा पथकांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. डॉ. सतीश मुंबरकर यांच्या हस्ते झालेल्या या उपक्रमाला गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दहीहंडी म्हणजे केवळ थरांचा खेळ नसून एकजूट, संघभावना, जिद्द आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. याच भावनेतून गोविंदा पथकांच्या सदस्यांचा उत्साह वाढविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध गोविंदा पथकांतील सदस्यांना आकर्षक टी-शर्टचे वाटप करण्यात आले.
टी-शर्ट मिळाल्यानंतर गोविंदा पथकांच्या सदस्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. आपल्या पथकाला मिळालेल्या या प्रोत्साहनाबद्दल सदस्यांनी आयोजकांचे आभार मानले. दहीहंडीच्या मैदानात उतरणाऱ्या गोविंदांच्या पाठीशी सामाजिक आणि राजकीय स्तरातून प्रोत्साहनाची भक्कम साथ उभी राहिल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
या प्रसंगी दुर्गेश बागुल सर यांची प्रमुख उपस्थिती होती. गोविंदा पथकांना सातत्याने प्रोत्साहन देत दहीहंडी उत्सवाची परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






