महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांच्या पुढाकाराने कामाला वेग

कल्याण : आंबिवली पश्चिमेतील रेल्वे फाटक परिसरातील साईबाबा मंदिर ते शिवमंदिर या मार्गाची अमृत पाईपलाईनच्या कामामुळे तसेच मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
पावसाने उघडीप देताच दुरुस्तीला सुरुवात
पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात येत असून कामाला वेग देण्यात आला आहे.
नागरिकांना मिळणार दिलासा
या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होत असल्याने रस्त्याची झालेली दुरवस्था हा स्थानिकांसाठी मोठा त्रास ठरत होता. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची वाहतूक आणि दैनंदिन ये-जा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
‘बोलण्यापेक्षा कामातून दाखवलं’
नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या भूमिकेतून रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याचे महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांनी सांगितले. “बोलण्यापेक्षा कामातून दाखवलं” या भूमिकेतून नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंबिवली पश्चिम येथील रेल्वे फाटक परिसरातील साईबाबा मंदिर ते शिवमंदिर या मार्गाची अमृत पाईपलाईनच्या कामामुळे तसेच पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. पावसाने उघडीप दिल्यानंतर नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन रस्त्याचे दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात आले असून युद्धपातळीवर काम करण्यात आले.
— ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल
महापौर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका






