आयआयटी विद्यार्थ्याच्या आत्महत्येने प्रकाश मुथा व्यथित; विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची गरज
कल्याण : देशासह कल्याण शहरात शांतता आणि सद्भावनेचे वातावरण कायम राहावे, भारताची लोकशाही अबाधित राहावी, अशी भावना शिक्षणतज्ज्ञ तथा शेठ हिराचंद मुथा कॉलेजचे चेअरमन प्रकाश मुथा यांनी व्यक्त केली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त उंबर्डे येथील शेठ हिराचंद मुथा स्कूलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.
विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज
अलीकडे आयआयटीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेचा उल्लेख करताना प्रकाश मुथा यांनी दुःख व्यक्त केले. “मी एक संस्था चालवतो. अशा प्रकारच्या दुःखद घटना समोर आल्या की मला मोठी चिंता वाटते. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या वेळीच समजून घेऊन त्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण व्हावे, तसेच शिक्षण व्यवस्थेत नवनवीन योजनांसह नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वाढदिवसानिमित्त सत्कार
प्रकाश मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन व अनावरण करून करण्यात आली. त्यानंतर मुथा महाविद्यालयाच्या वतीने सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून वापरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अॅपचे प्रकाश मुथा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. विविध केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मान्यवरांनी शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन प्रकाश मुथा यांचा सत्कार केला. कल्याण-डोंबिवली, मोहना, मुंबई, टिटवाळा तसेच ठाणे परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला शिक्षणतज्ज्ञ डॉ. दौलतसिंह पालीवाल, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नहायदे, अग्रवाल कॉलेजचे ट्रस्टी ओमप्रकाश मुन्ना पांडे, प्राचार्या अनुजा ब्रह्मा, स्कूलच्या प्राचार्या सपना गादिया, को-ऑर्डिनेटर अजय पिल्ले, सीए अन्वेशा मुथा, मनीष मुथा, अविनाश मुथा, दलितमित्र अण्णा रोकडे, अलका अवलस्कर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तसेच डॉ. सुशील पालीवाल, सुमितसिंह पालीवाल, मदन जयराज, डी.सी. राठोड, जयंतीलालजी मुथा, महेंद्र शंकलेशा, गौतम शंकलेशा, सुमेरमलजी मुथा, अमृतलालजी मुथा, देव पालीवाल, राम तरे, हाफिज शेख, संजय समिंद्रे, शत्रुघ्न भोईर, रश्मी शर्मा, जयवंत भोईर, पोली जेकब, विष्णुकुमार चौधरी, मुन्ना खंडेलवाल, कलीम शेख, योगेश गोड़े, महादेव पंजाबी, आशा माळी, गोपाल शर्मा, सलीम काझी, अनिल पंडित, बाबा तिवारी आदी उपस्थित होते.
“आजच्या वातावरणाचा विचार करता देशात तसेच कल्याण शहरात शांतता आणि सद्भावनेचे वातावरण कायम राहावे, हीच माझ्या वाढदिवसाची संकल्पना आहे,” असे प्रकाश मुथा यांनी यावेळी सांगितले.






