डॉ. संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी यांची उपस्थिती
कल्याण : अशोकनगर, वालधुनी येथील जेतवन बुद्ध विहारासमोरील पटांगणात २८ ऑक्टोबर रोजी फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरास अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय जाधव तसेच महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी नागरिकांना फिजिओथेरपी उपचारांसह विविध आरोग्यविषयक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमाचे कौतुक केले.






